मनसेने महायुतीला पाठींबा दिल्यानंतर सीएम शिंदेची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘राज ठाकरेंचे आभार, आता विधानसभेसाठी…’

मनसेने महायुतीला पाठींबा दिल्यानंतर सीएम शिंदेची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘राज ठाकरेंचे आभार, आता विधानसभेसाठी…’

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज ठाकरेंनी आज महायुतीला पाठींबा दिल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरेंनी केलेल्या विधानसभेबाबतच्या घोषणेवर मत व्यक्त केले आहे.

मी राज ठाकरेंचं स्वागत करतो. महायुतीला पाठींबा दिल्यानंतर मी त्यांचे आभार व्यक्त करत आहे. मोदींच्या नेतृखाली ते काम करणार आहेत. नक्कीच आता आम्ही सगळे मिळून चांगलं काम करु असा विश्वास शिंदेनी दिला. कोणतीही अट न ठेवता ठाकरेंनी महायुतीला पाठींबा दिलेला आहे हे फार महत्त्वाचं असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंनी आज विधानसभेच्या तयारीला लागण्याबाबतचे आवाहन मनसैनिकांना केले. त्यामुळे आता मनसे विधानसभेसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर बोलताना शिंदेंनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. लोकसभा होऊ द्या विधानसभेवर बोलू असं शिंदे म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news