महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न संसदेत मांडणार : चंद्रकांत हंडोरे

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न संसदेत मांडणार : चंद्रकांत हंडोरे
Published on
Updated on
प्रशांत वाघाये; नवी दिल्ली : राज्यसभेवर अलीकडेच निवडून आलेल्या खासदारांमधील १२ नवनिर्वाचित खासदारांना उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी बुधवारी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. महाराष्ट्रातून ६ खासदार राज्यसभेवर निवडुन गेले, त्यापैकी काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी आज शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या दालनात पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यातील काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी हिंदीतून शपथ घेतली.
राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी 'पुढारी'शी संवाद साधला. 'पुढारी'शी संवाद साधताना ते  म्हणाले की, "महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक प्रश्न देशाच्या सर्वोच्च सभागृहात आवाज उठवणार आहे. राज्यात आणि देशात मागासवर्गीय लोकांवर होत असलेले अत्याचार याकडे देशाचे लक्ष वेधणार असून राज्याच्या प्रगतीसाठी सर्व उपक्रमांची, योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांनाही विविध सुविधा मिळाल्या पाहिजेत, शासनाकडून मदत मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे. काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या दलित समाजातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिली, त्याल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आभार व्यक्त करतो. मी संसदेत उत्तम कामगिरी करेन, असे आश्वासनही मी त्यांना देतो." असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्यातून काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, भाजपच्या मेधा कुलकर्णी यांच्याशिवाय बिहारमधील राजदचे धर्मशीला गुप्ता, मनोज कुमार झा, संजय यादव, गुजरातमधील भाजप खासदार गोविंदभाई ढोलकिया, हिमाचल प्रदेशातील भाजप खासदार हर्ष महाजन, उत्तर प्रदेशमधून खासदार साधना सिंह, मध्यप्रदेशातून एल. मुरूगन, कांग्रेस खासदार अशोक सिंह, कर्नाटकमधून कांग्रेस खासदार जी. सी. चंद्रशेखर, हरियाणातून अपक्ष खासदार जगदीश चंद्रा यांनीही राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news