पुढारी ऑनलाइन डेस्क : Aurangabad सिटी बस चालकाने निष्काळजीपणे वाहन हाताळल्यामुळे बसमधील प्रवाशी विद्यार्थ्याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला. ही घटना 10 ऑक्टोरबर रोजी 12.40 वाजता शिवसेना भवन समोरील जिल्हा परिषद मैदान गेट औरंगपुरा, येथे घडली. याप्रकरणी सिटी बस चालकाविरुद्ध औरंगाबादच्या क्रांती चौकातील पोलीस ठाण्यात 13 ऑक्टोबर रोजी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad हरिओम राधाकृष्ण पंडित, असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी राधाकृष्ण शेनफड पंडित (वय 48 वर्षे, रा. वाळुंज एमआयडीसी, पीसी इंजिनियरिंग वर्कशॉप) यांनी तक्रार दिली. तर कपिल अशोक लोखंडे असे आरोपी सिटी बस चालकाचे (MH20EG98 62) नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मेनकुदळे यांनी गुन्हा दाखल केला.
Aurangabad पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिटी बस चालक कपिल अशोक लोखंडे याने सोमवारी (दि10) त्याच्या MH20EG98 62 सिटी बस ही निष्काळजीपणाने आणि सुरक्षित अंतर न ठेवता धोकादायकरित्या भरधाव वेगाने चालवली. त्यामुळे उजव्या बाजूनच्या आरशातून पाहून योग्य ते सुरक्षित अंतर न ठेवल्याने पाठीमागील स्थितीचा अंदाज आला नाही. परिणामी बसमध्ये शेवटच्या सीटवर बसलेला विद्यार्थी हरिओम पंडित याचे डोके जिल्हा परिषद संरक्षण भिंती लगतच्या लोखंडी खांबाला जोराने आदळले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक प्रभाकर सोनवणे करत आहेत.