Carousel : अजमेरमध्ये जत्रेत झोका कोसळला; 11 जखमी; व्हिडिओ व्हायरल

ajmer zoka
ajmer zoka

पुढारी ऑनलाइन डेस्क : राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात भरवण्यात आलेल्या जत्रेत हिंडोला (Carousel) झोका तुटून खाली कोसळल्याने 11 जण जखमी झाले. ही दुर्घटना काल मंगळवारी (दि.21) संध्याकाळी घडली. जत्रेत हा उंचावरून गोल फिरणारा हिंडोला (Carousel) झोका खालच्या बाजूला जाताना अचानक तुटला आणि जमीनीवर आदळला. यामुळे या झोक्यात बसलेल्या महिला आणि मुलं जमीनीवर आदळले. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अजमेरचे एएसपी सुशील कुमार यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की ही जत्रा अजमेर बस स्टँड जवळ भरवण्यात आली होती. या झोक्याची केबल तुटल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये 11 लोक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जेएलएन सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्व जखमी 11 महिला आणि मुलांच्या प्रकृतीत सुधारणा आहे.

वसुंधरा राजे यांनी केला शोक व्यक्त

दरम्यान, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी अजमेरच्या जत्रेत घडलेल्या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे, अजमेर बस स्टँड जवळ आयोजित जत्रेत झोका कोसळून महिला आणि लहान मुलांसह जवळपास 10 जण जखमी झाले. ही बातमी अत्यंत दुखद आहे. मी देवाजवळ सर्वांच्या स्वास्थ्याची कामना करते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news