ByteDance : टिकटॉक डेटा वापरून पत्रकारांवर ठेवली पाळत, चिनी कंपनीने दिली कबुली

ByteDance : टिकटॉक डेटा वापरून पत्रकारांवर ठेवली पाळत, चिनी कंपनीने दिली कबुली

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनची आघाडीची तंत्रज्ञान कंपनी बाइटडान्सच्या (ByteDance) 4 कर्मचाऱ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवरील अवैधपणे डेटाचा वापर करून पत्रकारांवर पाळत ठेवली होती. कंपनीची माहिती मीडियामध्ये लीक होण्याचे स्त्रोत शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हे कृत केल्याची कबुली आज (दि.२३) बाइटडान्स कंपनीने एएफपी या वृत्तसंस्थेला दिली.

बाइटडान्स (ByteDance) कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बझफीड आणि फायनान्शियल टाईम्सचे रिपोर्टर यांचा डेटा अवैधपणे काढून घेतला होता. या प्रकरणात सहभागी असलेल्या चार कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यात चीनमधील दोन आणि अमेरिकेतील दोन कर्मचारी आहेत. या कर्मचार्‍यांनी पत्रकारांचे आयपी अड्रेस मिळवून त्यांचा डाटा काढून घेतला होता.

बाइटडान्सचे जनरल काउंसिल एरिक अँडरसन यांनी सांगितले की, या प्रकरणात गुंतलेले कर्मचारी आता बाइटडान्सचे कर्मचारी नाहीत. त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. कंपनीच्या आचारसंहितेचे गंभीरपणे उल्लंघन करणाऱ्या या कृतीचा आम्ही निषेध करतो.
फायनान्शिअल टाईम्सने एका निवेदनात म्हटले आहे की पत्रकारांवर पाळत ठेवणे, त्यांच्या कामात हस्तक्षेप करणे किंवा त्यांच्या स्त्रोतांना धमकावणे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही या प्रकरणाची अधिक पूर्णपणे चौकशी करणार आहोत.

BuzzFeed News च्या प्रवक्त्या लिझी ग्राम्स यांनी सांगितले की, कंपनी या प्रकरणामुळे खूप व्यथित झाली आहे. पत्रकारांच्या तसेच टिकटॉक युजर्संच्या गोपनीयतेबद्दल आणि अधिकारांकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केले गेले आहे.

TikTok चे मुख्य कार्यकारी शौ झी च्यू यांनी म्हटले आहे की, कंपनीची तत्त्वे मला माहीत आहेत. अशा प्रकाराच्या गैरवर्तनाचे सर्मथन होऊ शकत नाही. युजर्सचा डेटा सुरक्षित असून राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news