बुलढाणा: ४ अवैध पिस्टलची तस्करी, चार आरोपींना अटक,सोनाळा पोलिसांची कारवाई

अवैध पिस्टलची तस्करी
अवैध पिस्टलची तस्करी

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : मध्यप्रदेशच्या सीमाभागातील पाचोरी परिसरातून बुलढाणा जिल्ह्यात देशी बनावटीच्या अवैध अग्नीशस्त्रांची (पिस्टल्स) तस्करी होत असून पोलिसांनी यापूर्वी अनेकवेळा कारवाया केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अवैध शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस दल सतर्क झाले आहे. त्यानुसार,जिल्ह्याच्या सीमाक्षेत्रातील सोनाळा, तामगाव, जळगाव, जामोद या तीन पोलीस ठाणे क्षेत्रात अवैध अग्नीशस्त्रांची खरेदी -विक्री करणा-या तस्करांचा शोध घेण्याची मोहीम राबवण्यात येत आहे.

या दरम्यान, सोनाळा पोलिस स्टेशनचे एपीआय चंद्रकांत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, पाचोरी मध्यप्रदेश येथून वसाडी शिवारात काही लोक अवैध अग्नीशस्त्रांचा सौदा करण्यासाठी येत आहेत. त्यावरून एपीआय चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकाने गुरुवार १८ एप्रिल रोजी वसाडी ते हडियाल या मार्गावर सापळा रचून निमखेडी फाट्याजवळ ४ संशयित व्यक्तींची अंगझडती घेतली. यावेळी त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे ४ अवैध अग्नीशस्त्र,१७ जीवंत काडतुसे, ३ मोबाईल व रोख ३२,३७०रू.असा एकूण २,१७,३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सोनाळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून चारही संशयितांना अटक करण्यात आली आहे. भारसिंग मिस-या खिराडेव, हिरचंद गुमानसिंग उचवारे (दोघेही रा.पाचोरी ता.खकणार जि .बु-हाणपूर म.प्र.),आकाश मुरलीधर मेश्राम, करुणा नगर बालाघाट (म.प्र.), संदिप अंतराम डोंगरे रा.आमगाव रा.बालाघाट (म.प्र.) अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news