Budget 2023-24 : मोठी घोषणा, ‘महिला सन्मान बचत पत्र योजना आणणार’ – अर्थमंत्री

Budget 2023-24 : मोठी घोषणा, ‘महिला सन्मान बचत पत्र योजना आणणार’ – अर्थमंत्री
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2023-24 साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या दुस-या टर्ममधील हे शेवटचे पूर्ण बजेट असणार आहे. मोदी सरकार हे महिला सशक्तीकरण आणि महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेताना दिसते. तसेच अर्थमंत्री स्वतः महिला असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काल अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी देशाच्या राष्ट्रपती आणि अर्थमंत्री या महिला आहेत याचा अभिमान व्यक्त केला होता.

महिलांसाठी 23-24 च्या अर्थसंकल्पातील तरतुदी

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण ही एक अशी संधी आहे जी वरील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी परिवर्तनकारी ठरू शकते, असे अर्थमंत्री म्हणाल्या.

महिला सन्मान बचत पत्र योजना आणणार, असल्याची महत्वपूर्ण घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.  महिला बचत योजनेत दोन लाखांच्या बचतीवर  7.50 टक्के व्याजदर मिळणार आहेत.

महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा करताना सीतारामण म्हणाल्या, आझादीका अमृतमहोत्सवाच्या स्मरणार्थ, एक वेळची नवीन अल्पबचत योजना 'महिला सन्मान बचत पत्र' मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेत आंशिक पैसे काढण्याच्या पर्यायासह 7.5% च्या निश्चित व्याज दराने ₹2 लाखांपर्यंत ठेव सुविधा मिळेल.

ही योजना 2023 पासून लागू करण्यात येईल. या योजनेअंतर्गत एक महिला दोन वर्षांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. या गुंतवणुकीवर महिलांना 7.5 टक्के व्याज मिळेल. विशेष म्हणजे गुंतवणूक केलेल्या या रकमेतून गरज असल्यास आंशिक रकम काढता देखील येणार आहे. ही योजना किसान सन्मान बचत पत्राप्रमाणेच असेल.

सध्या देशात अनेक लहान बचत योजना सुरू आहेत. महिला सन्मान बचत पत्राच्या माध्यमातून महिला चांगली बचत करू शकतात.
अर्थमंत्री निर्मला यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेली ही एक वेळची नवीन बचत योजना आहे, या घोषणेचे खूप कौतुक होत आहे.

स्मृती इराणी यांच्याकडून योजनेचे जोरदार स्वागत

संसदेत 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना मंत्री स्मृती इराणी महिला सन्मान बचत पत्राच्या घोषणेवर खूप आनंदी दिसल्या आणि त्या टेबलावर हात मारून समर्थन करत होत्या. अर्थसंकल्पाकडून महिलांच्या अपेक्षा महिला अर्थमंत्र्यांकडून खूप वाढल्या, यावेळीही महिलांना अर्थसंकल्पाकडून खूप आशा होत्या.

आतापर्यंतच्या अर्थसंकल्पातील महिलांसाठीच्या महत्वाच्या योजना आणि तरतूदी

2022-23 : या अर्थसंकल्पात महिला व बाल कल्याणकारी योजनांसाठी सर्वात जास्त 25,172.28 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली होती. यामध्ये मिशन शक्ती, मिशन वात्सल्य यासारख्या योजनांवर आतापर्यंतच्या अर्थसंकल्पातील सर्वात भरीव तरतूद करण्यात आली होती.

2021: पीएम उज्वला योजनेला मजबूती देऊन लाभार्थींची संख्या 1 कोटी इतकी वाढवण्यात आली. याव्यतिरिक्त 2020 च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणतीही मोठी तरतूद करण्यात आली नव्हती.

2020 : महिला स्वास्थ्यसाठी मोठी घोषणा, महिला संबंधी कार्यक्रमांसाठी 28,600 कोटी रुपयांची घोषणा महिला बचत गट योजनेतून ग्रामीण स्टोरेजला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन घोषणा…

2019 : नारी तू नारायणी : अर्थमंत्री निर्मला यांनी 2019 च्या अर्थसंकल्पातून नारी तू नारायणी योजना लाँच करण्याची घोषणा केली होती.
जनधन योजने अंतर्गत 5000 रुपयांचे ओवर ड्राफ्टची सुविधा देण्यात आली होती.

सेल्फ हेल्प ग्रुपमधील एका महिलेला मुद्रा स्कीम अंतर्गत 1 लाख रुपयांचे कर्ज आणि स्टँड अप इंडिया योजनेतून महिलांना लाभ देण्याची घोषणा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news