लंडन : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील एका मंदिरातून 40 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली योगिनी देवीची प्राचीन मूर्ती ब्रिटनकडून भारताला परत केली जाणार आहे. ही मूर्ती आठव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. ती 1970 च्या उत्तरार्धात किंवा 1980 च्या प्रारंभी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात असलेल्या लोकारी गावातील एका मंदिरातून चोरीला गेली होती.
ही मूर्ती भारताला परत करण्यासाठी आवश्यक ती औपचारिकता पूर्ण केली जात असल्याची माहिती लंडनमधील भारताच्या उच्चायुक्तांनी दिली आहे. व्यापार आणि आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे प्रथम सचिव जसप्रीत सिंग सुखीजा म्हणाले, लंडनमधील भारतीय उच्चायुक्त योगिनी देवीची मूर्ती परत घेण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. बहुतेक औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत.