Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ; दिल्ली पोलिसांकडून स्थितीदर्शक अहवाल सादर

Brij Bhushan Singh : बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ; दिल्ली पोलिसांकडून स्थितीदर्शक अहवाल सादर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले भारतीय कुस्ती संघाचे (डब्ल्यूआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या खटल्यात दिल्ली पोलिसांनी राऊज एवेन्यू न्यायालयात स्थितीदर्शक अहवाल सादर केला आहे. प्रकरणाशी संबंधित सर्व पीडितांचे बयाण नोंदवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. दरम्यान न्यायालयाने तक्रारदारांना स्थितीदर्शक अहवाल उपलब्ध करवून देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. दरम्यान, शनिवारीच पीडितांच्या वकिलांना अहवालाची प्रत देण्यात आली. पुढील सुनावणी २७ जूनला घेण्यात येईल.

जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी राऊज एवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली होती.न्यायालयाने दिल्ली पोलिसांना पीडितांचे बयाण नोंदवण्याचे निर्देश द्यावेत,अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना स्थितीदर्शक अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले होते.न्यायालयाच्या निर्देशांनूसार पोलिसांनी हा अहवाल सादर केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news