Breaking News : MP : खरगोन : पेट्रोल आणि डिझेलने भरलेल्या टँकरमध्ये स्फोट, दोन ठार, 8 मुलांसह 22 जखमी

Breaking News : Petrol & diesel tanker blast
Breaking News : Petrol & diesel tanker blast

पुढारी ऑनलाइन डेस्क : Breaking News : खरगोनमध्ये पेट्रोल आणि डिझेलने भरलेल्या टँकरमध्ये स्फोट, दोन ठार, 8 मुलांसह 22 जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली व जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Breaking News : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलने भरलेला टँकर उलटला. बिस्तान पोलीस स्टेशन हद्दीतील मोगरगाव गढी रोडवरील अंजनगाव गावाजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, टँकर असंतुलित झाला होता. त्यामुळे ते उलटले. टँकर उलटल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. आदिवासीबहुल गाव असल्याने येथे अनेक लोक जमले. त्याचवेळी टँकरने अचानक पेट घेतला आणि त्याचा स्फोट झाला. स्फोटामुळे दोन ठार झाले.  तर आठ मुलांसह 22 जण जखमी झाले आहेत.

या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला, तर 22 हून अधिक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली व जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये 8 लहान मुले आणि 13 महिला व पुरुषांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news