राम गोपाल वर्माचा अभिनेत्रीच्या पायाच्या किस घेण्याबद्दल केला खुलासा

राम गोपाल वर्मा
राम गोपाल वर्मा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी तेलुगु अभिनेत्री आशू रेड्डीच्या पायाला किस करतानाचा एका व्हिडिओ शेअर व्हायरल झाला होता. यानंतर वर्मा यांना सोशल मीडियावरील नेटकऱ्याचे चांगलेच धारेवर धरत ट्रोलदेखील केलं होतं. याच दरम्यान राम गोपाल वर्मा यांनी घडलेल्या घटनेविषयी खुलासा केला आहे.

राम गोपाल वर्माने यांनी नुकतेच ट्विटरवर घडलेल्या प्रकाराबद्दल एक पोस्ट शेअर करत स्वत:ची तुलना कुत्र्याशी केली आहे. त्यांनी ट्विटरवर आगामी 'डेंजरस' चित्रपटातील अप्सरा राणी आणि तिच्या कुत्र्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. यात अप्सरा राणी एका सोफ्यावर झोपली असून तिचा कुत्रा तिच्या पायांवर उभा असल्याचे दिसतेय. यावरून राम गोपाल यांनी आशू रेड्डीच्या पायाजवळ बसण्यास मी अप्सरा राणीच्या कुत्र्याकडून शिकलो असल्याचे म्हटलं आहे. या त्याच्या पोस्टमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

याआधी राम गोपाळ यांनी त्याच्या आगामी 'डेंजरस' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आशू रेड्डीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीदरम्यानच त्यांनी आशू रेड्डीच्या पायाला किस केलं होत. या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि त्याना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news