Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक?

rashmika mandanna
rashmika mandanna

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाने ( Rashmika Mandanna ) 'पुष्पा' चित्रपटातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटानंतर रश्मिकाची सोशल मीडियावर क्रेझ निर्माण झाली. तर ती जास्तीत- जास्त चाहत्यांच्या संपर्कात आल्याने सोशल मीडियावर फोलोअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. सध्या रश्मिकाच्या चाहत्यांसाठी एक धक्कदायक वृत असून तिचे सोशल मीडियावरील अकाउंट हॅक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परंतु, ही माहिती खरी आहे की खोटी? याबाबत रश्मिकाने किंवा इतरांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळे नेटकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दोन दिवसापूर्वी रश्मिकाने ( Rashmika Mandanna ) ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा' हा चित्रपट न पाहिल्याने तिला सोशल मीडियावर ट्रोलिग सामना करावा लागला होता. यानंतर तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले. यात तिने म्हटलं की, 'नेटकऱ्यांवर माझे खूपच प्रेम आहे. त्याविषयी आणखी काय वेगळं करावं की म्हणावं हे मला आता समजत नाही. त्यामुळे हा विषय त्यांच्यावरच सोपवलेला बरा.'  कदाचित या वक्तव्यामुळे आता तिचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले असे बोलले जात आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर रश्मिका 'पुष्पा' च्या सिक्वेल म्हणजे, 'पुष्पा २'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पुन्हा एकदा साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. याशिवाय रश्मिका शेवटची बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन याच्यासोबत 'गुडबाय' चित्रपटात दिसली होती. याशिवाय विजय देवराकोंडासोबतच्या रिलेशनशिपचे फोटो व्हायरल झाल्याने ती चर्चेत आली होती.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news