पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री नयनतारा ( Nayanthara) तिचा बॉयफ्रेंड विग्नेश शिवनसोबत गेल्या जून महिन्यात लग्न बंधनात अडकली. या कपलच्या लग्नापासून ते हनिमूनपर्यंतचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड होत असतात. याच दरम्यान नयनताराने विग्नेशचा प्रसिद्ध बुर्ज खलिफावर ३७ व्या वाढदिवसाला साजरा करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळचे दोघांचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
विग्नेश शिवनने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच पार पडलेल्या ३७ व्या वाढदिवसाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत विग्नेश शिवन आणि नयनतारा रोमॅन्टिक मूडमध्ये दिसले. तर दुसऱ्या एका फोटोत विग्नेशसोबत जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रीणी दिसतात. नयनताराने ( Nayanthara ) पतीचा वाढदिवस मुंबईतील प्रसिद्ध बुर्ज खलीफाच्या खाली साजरा करून त्याला सरप्राईज दिलं आहे. यावेळी नयनताराने एका खास पार्टीचे आयोजनही केलं होतं.
या फोटोसोबत विग्नेश शिवनने लिहिले आहे की, 'प्रेमाने भरलेला वाढदिवस. माझ्या कुटुंबाने मला एक सरप्राइज दिलं. बुर्ज खलिफाच्या खाली माझा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. बुर्ज खलिफावर वाढदिवस साजरा करून नयनताराने मला आश्चर्यचकित केलं आहे. यापेक्षा चांगले आणि विशेष काहीही असू शकत नाही. मला या आयुष्यात इतके सुंदर क्षण दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.' हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह अनेक स्टार्संनी भरभरून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
नयनतारा आणि विग्नेशची पहिली भेट 'नानुम राउडी धान' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हा चित्रपट विग्नेश शिवनने दिग्दर्शित केला होता. तर या चित्रपटात नयनताराने मुख्य भूमिका साकारली होती. पहिल्यांदा दोघांच्यात चांगली मैत्री झाली आणि यानंतर त्याचे रूपारंत प्रेमात झाले. २०१६ मध्ये एका अवॉर्ड फंक्शनमध्ये दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपची घोषणा केली. जवळपास ५ वर्षाच्या डेंटिगनंतर दोघांनी गेल्या ९ जून २०२२मध्ये लग्न केलं आहे. या लग्नाला साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तीसोबत बोनी कपूर, शाहरुख खान आणि ए.आर. रहमान यांनी हजेरी लावली होती.
हेही वाचलंत का?