Blood Delivery : देशभरात ड्रोनद्वारे रक्ताची डिलिव्हरी शक्य होणार, ‘आयसीएमआर’ ने घेतली यशस्वी चाचणी

blood Delivery
blood Delivery

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली दि 11 : आगामी काळात देशभरात रक्ताची डिलिव्हरी ड्रोनद्वारे करता येणे शक्य होणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने [आयसीएमआर] याबाबत यशस्वीरित्या चाचणी घेतली आहे. ड्रोनद्वारे रक्ताची डिलिव्हरी करण्याच्या अनुषंगाने 'आय-ड्रोन' नावाची मोहीम हाती घेतली असल्याचे आयसीएमआरचे महासंचालक डाॅ. राजीव बहल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोरोना संकटकाळात सर्वप्रथम गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी ठराविक ठिकाणी ड्रोनद्वारे रक्ताचा पुरवठा करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. आता याच योजनेचा विस्तार देशभरात केला जाणार आहे. रक्ताची वाहतूक कमी तापमानात करणे गरजेचे असते. शिवाय रक्ताचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न होणेही तितकेच आवश्यक असते. त्यामुळे ड्रोनद्वारे रक्ताची डिलिव्हरी करताना विशिष्ठ तंत्रज्ञान वापरले जाईल.

जगातील अनेक देशांत सध्या ड्रोनद्वारे रक्ताबरोबरच लसी, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची डिलिव्हरी केली जात आहे. ठराविक देशांमध्ये दुर्गम, ग्रामीण व पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या ठिकाणी प्रत्यारोपण केले जाणारे मानवी अवयव ड्रोनद्वारे पोहोचविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातही प्रायोगिक तत्वावर असे प्रयोग भविष्यात होण्याची गरज असल्याचे डाॅ. बहल यांनी नमूद केले.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news