भाजप दीडशेच्या वर जाणार नाही : प्रकाश आंबेडकर

भाजप दीडशेच्या वर जाणार नाही : प्रकाश आंबेडकर
Published on
Updated on
वर्धा; पुढारी वृत्तसेवा : भाजप दीडशे जागांच्या वर जाणार नाही. ४०० जागांचा आकडा सांगणं हा स्वतःची समजूत काढण्यासारखं आहे. ते पूर्णपणे घाबरले आहे. म्हणून ते पक्ष फोडा असे करत आहे. स्वतःच घर सुरक्षीत ठेवण्यासाठी दुसऱ्याच्या घरावर बुलडोजर चालवणारा घाबरलेला असतो, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
वर्धा येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस असं दोन्ही म्हणतात आम्ही हिंदू धर्माचे प्रतीनिधी आहो. पहिला प्रश्न आमच्यासमोर येतो की बहुसंख्य पूर्णपणे हिंदू आहे आणि मग धार्मिक राजकारण कशासाठी याचा खुलासा मिळत नाही अशी परिस्थिती आहे. मागील दहा वर्षात जे वक्तव्य आणि कारवाई झाली त्यातून वैदिक परंपरा विरुद्ध संत परंपरा याची पुनरवृत्ती आताही दिसत आहे. संतांच्या विचारांनी आधारित जे संविधान आहे त्या विरोधात भाजप आणि आरएसएस दिसत आहे. उद्याच संविधान कस असेल या बद्दल ते चर्चा करत नाही पण जे सूचक वक्तव्य येते त्यातून हिटलरशाहीशी आधारित किंवा हिटलरशाहीला पुरस्कृत करणारी घटना असेल.
1950 ते 2013 पर्यंत देशाचं नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या 7200 होती. पण 2013 पासून आतापर्यंत 24 लाख कुटुंब तेही हिंदू कुटुंब ज्यांची मालमत्ता किमान 50 कोटी असेल अश्याना देश मजबूर करून देश सोडायला लावल. त्यांनीही नागरिकत्व सोडल आणि परदेशात जाऊन नागरिकत्व स्वीकारल. देशाचं नागरिकत्व सोडणारा वर्ग हा संत परंपरेला मानणारा होता, त्यांच्यासमोर अशी परिस्थिती केली की त्यांना नागरिकत्व सोडाव लागल. हिंदूंच्या राज्यात हिंदूंना देश सोडून जावं लागत, नागरिकत्व सोडून जावं लागत ही प्रचंड मोठी शोकांतिका आहे, अशीही टीका आंबेडकर यांनी केली. शेतकऱ्यांचा दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. ही मागणी सरकारने मान्य केली पाहिजे, असही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news