भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

BJP corporator Vasant Borate joins NCP
BJP corporator Vasant Borate joins NCP
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सत्ताधारी भाजपचे मोशी प्रभागाचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत गुरूवारी (दि.17) झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याचे पक्षात स्वागत केले.

या वेळी नवनिर्वाचित शहराध्यक्ष नगरसेवक अजित गव्हाणे, माजी महापौर प्रवक्ते योगेश बहल, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट आणि पदाधिकारी आदी उपस्थित होते.

नगरसेवक बोराटे यांनी भाजपवर टीका करीत बुधवारी (दि.16) नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा सत्ताधारी भाजपला म्हणजेच आमदार महेश लांडगे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news