Urfi Javed : उर्फीने वापरली मॅजिक ट्रिक; आतापर्यंतच्या फॅशनमध्ये पाहण्यासारखा गाऊन (video)

Urfi Javed
Urfi Javed
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही मालिका आणि बिग बॉस फेम उर्फी जावेद ( Urfi Javed ) तिच्या वेगवेगळ्या फॅशन स्टाईलने सर्वानाच आश्चर्यचकित करत असते. यामुळे कधी तिचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक केलं जाते. तर कधी तिला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र, या गोष्टीचा उर्फीला काडीमात्र फरक पडत नाही. याशिवाय ती नेहमी तिच्या हटके तोकड्या कपड्याची स्टाईल करत असते. सध्या तिने तिने तिच्या गाऊनमध्ये अनोखी एक मॅजिक ट्रिक वापरल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र, तिने स्वत: हाताची टाळी वाजवताच तिच्या ड्रेसमधून फुलपाखरे उडताना दिसतात. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या वेगेवेगळ्या आणि हटके फॅशनमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. अनेकदा बोल्ड स्टाइल आणि शॉर्ट, तोकड्या कपड्यांमध्ये ती दिसत असते. यावेळी मात्र, तिच्या मॅजिक ट्रिक वापरलेल्या गाऊनची जोरदार चर्चा होत आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर मोठी फुले असणाऱ्या ब्लॅक रंगाच्या ड्रेसमधील एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओतील खास म्हणजे, उर्फी रेड कार्पेटवर असून हा मॅजिक गाऊन तिने यावेळी परिधान केलाय. यावेळी पापॉराझीची तिच्यावर नजर पडली. त्याना तिने हकटे मॅजिक ट्रिक दाखवली आहे.

उर्फीने यावनेळी स्वत: च्या हाताची टाळी वाजवताच तिच्या ड्रेसवरून वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरे उडताना आणि खाली पडताना दिसतात. यातील काही तर तिच्या कपड्यावर आणि रेड कार्पेटवरदेखील पडत आहेत. यावेली ही फुलपाखरं फुलासारखी दिसत आहेत. तिच्या ड्रेसवर हिरव्या रंगाची मोठ्या आकाराची फुलेही दिसतता. हे पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. याशिवाय तिने केसांची स्टाईन, गळ्याने चेन, लिपस्टिक आमि मेकअपने लूक पूर्ण केलाय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने "Uorfi Javed created magic dress ? wait for special Revel ? she is just setting bar for fashion game❤️??" असे लिहिलंय.

उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 'By far my most favourite outfit of yours. Met Gala ready', 'कुछ भी बोलो यार बंदी है तो बहुत टैलेंटेड',"Unique hai Apke tarah "??', 'Wow nice dress, Pehli baar itni achi dress pehni hai urfi ne ❤️','Tareef ke kabil toh h ye'. यासारख्या अनेक कॉमेन्टस नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास २० लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news