Gas cylinder price : सर्वसामान्यांना दिलासा, गॅस सिलिंडर दरात मोठी कपात

Gas cylinder price : सर्वसामान्यांना दिलासा, गॅस सिलिंडर दरात मोठी कपात

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर होण्यापूर्वी एक दिलासा देणारी बातमी आहे. राष्ट्रीय तेल कंपन्यांनी आजपासून म्हणजेच १ फेब्रुवारीपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (Gas cylinder price) किमती ९१.५० रुपयांनी कमी केल्या आहेत. दिल्लीत आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १९०७ रुपये असेल. नवीन दर आजपासून (१ फेब्रुवारी) लागू झाले आहेत. (Gas cylinder price)

तथापि, तेल कंपन्यांनी विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणतीही कपात केलेली नाही. देशाची राजधानी नवी दिल्लीत विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ८९९.५ रुपयांवर कायम आहे.

गेल्या महिन्यात म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (१ जानेवारी) देखील तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०२.५० रुपये प्रति सिलिंडर प्रमाणे कपात केली होती, तर १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.

हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये व्यवसायिक गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत खाद्यपदार्थांच्या दरात कपात होणे अपेक्षित आहे. याआधी कंपन्यांनी १ डिसेंबरला व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग केले होते.

गेल्या ९० दिवसांपासून तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात बदल केलेला नाही. त्याचवेळी कच्चा तेलाचे दर मागच्या सात वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर गेला आहे. ब्रेंट क्रूडमध्येही कमालीची वाढ दिसून आली. जागतिक मानक मानले जाणारे ब्रेंट क्रूड १.३० टक्क्यांनी वाढून ९१.२० डॉलर प्रति बॅरल झाले. ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.८७ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ ९०.८१ वर पोहोचले. (Gas cylinder price)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news