भाईंदरचा आशुतोष सहा ठरला ‘अटल श्री 2024’चा मानकरी!

आशुतोष सहा
आशुतोष सहा

विरार : पुढारी वृत्तसेवा :  विरार-मनवेल पाडा येथे आयोजित 'अटल श्री 2024ॠ या शरीरसौष्ठव स्पर्धेचा बहुमान भाईंदर येथील चॅम्पियन्स जीमचा आशुतोष सहा (26) याने पटकावला. सोमवारी (26 फेब्रुवारी रोजी) 'अटल श्री 2024 'या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विरार, पालघर, ठाणे, भिवंडी आणि शहापूर परिसरातून पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. तब्बल पाच वजनी गटांत झालेल्या या स्पर्धेत भाईंदर येथील चॅम्पियन्स जीमचा आशुतोष सहा (26) याने उत्कृष्ट शरीर सौष्ठवाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत धडक दिली.

संबंधित बातम्या 

भाजपचे मनोज पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकाला स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पालघर जिल्हा बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे शशिकांत भोगले, दीपक पवार, मकरंद सावे व वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा असोसिएशनचे सदस्य विश्वनाथ तळेकर यांनी स्पर्धा परीक्षक म्हणून काम पाहिले.

भारतीय जनता पार्टी वसई-विरार जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा व अटल उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विरार मनवेल पाडा येथे 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान, 'कोकण महोत्सव 2024ॠचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवातील विविध कार्यक्रमांचा भाग म्हणून सोमवारी पालघर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन सहकार्याने अटल श्री 2024 या शरीरसौष्ठव स्पर्धा ठेवण्यात आली होती. या काळात महिला हळदी-कुंकू, डबलबारी आणि खाद्यपरंपरेने या महोत्सवाची रंगत वाढवली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news