कोवळ्या उन्हाचे आरोग्यासाठी काय आहेत फायदे? जाणून घ्या अधिक

Sun Rays for Health
Sun Rays for Health
Published on
Updated on

उन्हात जास्त वेळ थांबल्याने त्वचा काळवंडते. सूर्याची प्रखर किरणे त्वचेवर पडल्यामुळे सनबर्न होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. मात्र, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर तंदुरुस्त आरोग्यासाठी सूर्याची किरणे खूप आवश्यक आहेत. (Benefits Of Morning Sunlight)

मानवाच्या शरीरासाठी सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन्स गरजेचे असतात. यातीलच एक म्हणजे व्हिटॅमिन डी. आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन-डी खूप गरजेचे आहे. कारण आपले शरीर व्हिटॅमिन-डीचे उत्पादन करु शकत नाही. त्यामुळे डॉक्टर रोज 20 ते 30 मिनिटे कोवळ्या उन्हात उभं राहण्याचा सल्ला देतात. व्हिटॅमिन डी सूर्याच्या किरणांपासून मिळते. मात्र, सूर्यांच्या प्रखर किरणांऐवजी पहाटेची कोवळी उन्हे घ्या. सूर्याची कोवळी किरणे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक रोगही दूर होतात. सूर्याच्या किरणांमुळे शरीराला काय फायदे होतात, हे जाणून घेऊया.

तणाव कमी करण्यासाठी

सकाळी कोवळ्या उन्हात बसल्याने किंवा वॉक घेतल्याने शरीरात मेलाटोनिन नियंत्रित करण्यास मदत मिळते. यामुळे तणाव व स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. फक्त कोवळ्या उन्हात बसण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीदेखील करू शकता. ज्यामुळे तुमचा तणाव कमी होऊ शकतो.

रोगप्रतिकार शक्ती

सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्यामुळे रोगप्रतिकार वाढण्यासही मदत होते. सूर्याच्या किरणांमुळे कमी वेळात रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर अनेक आजारांचा धोका कमी होतो.

हाडे मजबूत करण्यासाठी

हाडे ठिसूळ असतील कॅल्शियमच्या बरोबरच व्हिटॅमिन डीचीदेखील मुख्य भूमिका असते. सूर्याची किरणे व्हिटॅमिन डीचा मुख्य स्रोत असतात. तुम्ही 15 मिनिटे जरी कोवळ्या उन्हात व्यायाम केला किंवा चाललात तर हाडांना बळकटी येते. डॉक्टरही हिवाळ्यात कोवळ्या उन्हात फिरण्याचा सल्ला देतात.

निरोगी झोपेसाठी

जर रोज 1 तास कोवळ्या उन्हात बसल्यास किंवा व्यायाम केल्यास रात्री चांगली झोप येते. याचे कारण म्हणजे तुम्ही जितके जास्तवेळ कोवळ्या उन्हात बसाल तितके झोपताना तुमचे शरीर जास्त मेलाटोनिन निर्माण करते. ज्यामुळे तुम्हाला खूप चांगली झोप येते.

वजन नियंत्रणात राहते

सूर्याची कोवळी किरणे आणि बीएमआय याच्यांत थेट संबंध आहे. कोवळे उन्हात बसल्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते. ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होते. हिवाळ्यात कमीतकणी १५ मिनिटे उन्हात बसले पाहिजे जेणेकरून तुमचे वजन नियंत्रणात राहिल. (Benefits Of Morning Sunlight)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news