Mango Peel Benefit : आंबे खाल्ल्यानंतर साल फेकून देऊ नका; जाणून घ्या फायदे

Mango Peel Benefit
Mango Peel Benefit
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंबे म्हटलं की, लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. आता आंब्याचा सीझन सुरू झालाय. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन आब्यांचे प्रकार उपलब्ध झाले आहेत. रायवळ, तोतापुरी, लंगडा, बदामी, कलमी, हापूस, पायरी, नीलम, केसर यासारख्या अनेक प्रकारचे आंबे बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आब्यांच्या रसाचा उपयोग केला जातो आणि त्याची साल फेकून दिली जाते. परंतु, तुम्हाला माहिती आहे काय, आंब्याच्या रसा इतकेच त्याच्या सालीतही अनेक गुणर्धम असतात. त्‍या विषयी जाणून घेऊया… ( Mango Peel Benefit )

चेहऱ्यावर ग्लो

चेहऱ्यावर जास्त प्रमाणात सुरकुत्या पडलेला असल्यास यावर आंब्याची साल उपयुक्त ठरते. आंब्याची साल वाळवून ती बारीक वाटून घ्यावी. यानंतर या पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून त्याची पेस्ट करून चेहऱ्यावर लावावी. हे नियमितपणे लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होऊन चेहरा तजेलदार बनतो. उन्हाळ्यात चेहऱ्यावर मुरुमे आणि पुरळ आली तरीदेखील आंब्याच्या सालीची पेस्ट लावल्यास कमी होण्यास चमक येण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आंब्याच्या सालीत व्हिटॅमिन ए आणि सी हे घटक असल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. यासोबत आंब्याच्या साली शरीरातील पचनशक्ती सुधारण्यास आणि संसर्गजन्य रोगांपासून दूर ठेवण्‍यासाठी उपयुक्त ठरते.

मधुमेहावर नियंत्रण

आंब्याच्या सालीत ट्रायटरपेन्स आणि ट्रायटरपेनॉइड्स नावाचे घटक असल्याचे मानवाच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसेच हृदयाचे आजार, मधुमेह आणि रक्तातील कोलेस्ट्राल कमी करण्यास आंब्याची साल मदत करते.

केस गळती कमी करणे

आंब्‍याची कोयमध्ये अनेक घटक असल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. केस गळती आणि केसांतील कोंडा कमी करण्यास उपयुक्त आहे.

कॅन्सरचा धोका कमी करणे

आंब्याच्या सालीमध्ये अनेक नैसर्गिक घटक असल्यामुळे शरीरात मृत पेशींची वाढ थांबते. त्यामुळे मानवाच्या शरीरातील कर्करोगाचा धोका कमी होतो. याशिवाय वजन नियंत्रणात ठेवण्यास याचा फायदा होतो.

सेंद्रिय खत

आंब्याच्या सालीमध्ये 'कॉपर', 'फोलेट' आणि जीवनसत्त्वे 'बी ६','ए' आणि 'सी' हे घटक भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात फायबर आढळते. यामुळे यांचा झांडाना सेंद्रिय खत म्हणून वापर केला जातो. ( Mango Peel Benefit )

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news