बीड : मराठा आंदोलक आक्रमक, आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्‍या

आमदार प्रकाश सोळंकेच्या घरावर दगडफेक
आमदार प्रकाश सोळंकेच्या घरावर दगडफेक

बीड : पुढारी वृत्‍तसेवा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारी आमदार प्रकाश सोळंके यांची क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर मराठा समाज बांधवांमधून या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या दरम्यानच आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत त्‍यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्‍यान येथील गाड्याही पेटवण्यात आल्‍याचे समाेर आले आहे.

आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरासमोर जमत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. दरम्‍यान आंदोलकांनी बंगल्‍यात प्रवेश करत पार्किंगमधील गाड्यांची तोडफोड करत, गाड्या पेटवल्‍या. यामुळे या ठिकाणी आग आणि धुराचे लोट पसरले होते. त्‍यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाल्‍याचे पाहायला मिळाले.

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. मात्र जरांगे यांची प्रकृती खालावत चालल्‍याने शासनाने मराठा आरक्षणाचा लवकर निर्णय घ्‍यावा, या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी साखळी उपोषण, रस्‍ता रोको, नेत्‍यांना गावबंदी या सारख्या आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यास सुरूवात केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news