पुढारी ऑनलाइन डेस्क : Balasore Train Accident : ओडिशातील बालासोर येथे 3 रेल्वे गाड्यांच्या शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातानंतर शनिवारी दुपारपर्यंत बचावकार्य पूर्ण करण्यात आले. त्यानंतर रेल्वे रुळावर रेल्वे डब्यांचे साचलेले ढीग, तसेच रूळाची दुरुस्ती आदी कामे अजूनही सुरू आहेत. एकीकडे मलबा उपसण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे रूळ दुरुस्ती केली जात आहे. एएनआयने अपघातानंतर परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी सुरु असलेल्या कामाचे ड्रोन द्वारे चित्रीत केलेला व्हिडिओ ट्विट केला आहे.
Balasore Train Accident : रेल्वे मंत्रालयानुसार १००० पेक्षा जास्त मनुष्यबळ या कामात गुंतले आहे. ७ पेक्षा जास्त पोकलेन मशीन, २ अपघात मदत गाड्या, ३-४ रेल्वे आणि रोड क्रेन तैनात करण्यात आल्या आहेत.
ANI च्या ड्रोन कॅमेऱ्यातील हवाई दृश्ये ज्या ठिकाणी प्राणघातक #BalasoreTrainAccident घडली त्या ठिकाणी रेल्वे मार्ग पूर्ववत काम सुरू असल्याचे दाखवले आहे.
दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्य सार्वजनिक संबंध अधिकारी (CPRO), आदित्य कुमार चौधरी, यांनी याविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, "कापलेल्या बोगी काढण्यात आल्या आहेत. मालगाडीच्या 2 बोगीही काढण्यात आल्या आहेत. एका बाजूने ट्रॅक जोडण्याचे काम सुरू आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करू":