राम मंदिर जनतेसाठी खुले
राम मंदिर जनतेसाठी खुले

अयोध्या : राम मंदिर जनतेसाठी खुले; भाविकांची पहाटेपासूनच गर्दी

अयोध्या ; पुढारी वृत्‍तसेवा अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्‍लाची काल सोमवार (२२ जानेवारी) रोजी प्राणप्रतिष्‍ठा करण्यात आली आहे. देशभरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. देशभरातून भाविकांचा ओघ अयोध्येतील राम मंदिराच्या दिशेने सुरू झाला आहे. आजपासून मंदिर सर्वसामांन्यांना दर्शनासाठी खुले झाले आहे.

अशा स्थितीत आज उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच या मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी होऊ लागली आहे. रात्री उशिरापासूनच हजारो लोक मंदिराबाहेर जमू लागले. पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडाली आहे.

रात्री उशिरापासूनच राम मंदिराच्या मुख्य दरवाजाबाहेर भाविकांची मोठी रांग लागली होती. पहाटे 2 वाजल्यापासून येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. गर्दीत उपस्थित लोक गेटसमोर 'जय श्री राम'चा जयघोष करत मंदिरात प्रवेश करत आहेत. देशभरातून भाविक हजेरी लावत आहेत. यासोबतच अयोध्येतील स्थानिक रहिवासीही राम मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी पोहोचत आहेत.

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सुमारे 2 आठवड्यांपूर्वी अयोध्येतील हॉटेल बुकिंग 80 टक्क्यांनी वाढले आहे. येथे हॉटेलमधील एका दिवसाच्या खोलीची किंमत सर्वकालीन उच्च दरावर पोहोचली आहे, जी पाच पटीने वाढली आहे. काही आलिशान खोल्यांचे भाडे एक लाख रुपयांपर्यंत गेले आहे. विशेष म्हणजे भाड्यात एवढी वाढ होऊनही हॉटेल बुकिंग दररोज वाढत आहे.

पीएम मोदींनी मंदिराचे उद्घाटन केले

22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे उद्घाटन केले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी, बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, रणवीर कपूर, आलिया भट्ट, साऊथ सुपरस्टार रजनीकांत, चिरंजीवी, राम चरण यांच्यासह देशातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.


हेही वाचा : 

logo
Pudhari News
pudhari.news