औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक पात्रता चाचणी( टीईटी ) घोटाळ्यासंबंधी राज्यातील ७८८० शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा शिक्षकांवर पुढील कारवाई न करण्याचे आदेश देतानाच या शिक्षकांना या महिन्यापासून वेतन देण्याचे मात्र वार्षिक वेतनवाढ न देण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा्ने दिला आहे.
'टीईटी' घोटाळ्यातील सर्व शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आलेले आहे. या प्रकरणी आज (दि.२०) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणीत न्या. रविंद्र घुगे आणि न्या. अरुण पेडणेकर यांनी अशा शिक्षकांवर पुढील कारवाई न करण्याचे आदेश देतानाच या शिक्षकांना या महिन्यापासून वेतन देण्याचे मात्र वार्षिक वेतनवाढ न देण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेवर पुढील सुनावणी १४ नोव्हेंबरला ठेवण्यात आली असल्याची माहिती ॲड. संभाजी टोपे यांनी दिली.