डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर आकर्षक रोषणाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर आकर्षक रोषणाई

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. बौद्ध भाविकांसाठी दीक्षाभूमी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. दीक्षाभूमीचा संपुर्ण परिसर निळ्या पंचशील ध्वजांनी सजविण्यात आला असून उद्या हजारो भाविक दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल होणार आहेत.

दीक्षाभूमी स्मारक समितीने उत्कृष्ट व्यवस्था केली असून बौद्ध भाविकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत. जवळच असलेल्या शासनाच्या सामाजिक न्याय भवनावर देखील आकर्षक रोषणाई आकर्षणाचे केंद्र ठरले असून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दीक्षाभूमी आणि सामाजिक न्याय भवनसह संविधान चौक, वर्धा रोड, इंदोरा , पाचपावली, मेडिकल, रामेश्वरी रोड आदी विविध भागांमध्ये ठिकठिकाणी आकर्षक विधुत रोषणाई, चौकाचौकामध्ये सजावट करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news