एकाचवेळी तिघेही पराभूत झाले; बारा वर्षांत थेट पंतप्रधान बनले

एकाचवेळी तिघेही पराभूत झाले; बारा वर्षांत थेट पंतप्रधान बनले

दारुण पराभव स्वीकारल्यानंतरही राजकीय क्षेत्रात कोणाचे नशीब कधी चमकेल सांगता येत नाही. 1984 मधील सार्वत्रिक निवडणुकीत तीन दिग्गज नेत्यांना दणदणीत पराभव स्वीकारावा लागला होता. हे तिघे म्हणजे अटलबिहारी वाजपेयी, चंद्रशेखर आणि पी. व्ही. नरसिंहराव. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मतदार संघातून माधवराव शिंदे यांनी वाजपेयी यांच्यावर विजय मिळवला, तर उत्तर प्रदेशातील बलिया या आपल्या पारंपरिक मतदार संघातून चंद्रशेखर हे काँग्रेसच्या जगन्नाथ चौधरींकडून पराभूत झाले होते.

आंध्र प्रदेशातून भाजपचे सी. जंगा रेड्डी यांनी नरसिंहराव यांना तेव्हा धूळ चारली होती. भाजपने त्यावेळी दक्षिण भारतातून मिळवलेल्या या विजयाची तेव्हा भरपूर चर्चा झाली होती. विशेष म्हणजे या पराभवानंतर 1990 मध्ये चंद्रशेखर पंतप्रधान बनले. पाठोपाठ 1991 मध्ये नरसिंहराव यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली. नंतर 1996 मध्ये वाजपेयी पंतप्रधान झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news