एका माध्यमाशी बोलताना आशीष देशमुख म्हणाले की, नाना पटोले हे 'वज्रमूठ' सभेत गैरहजर होते. आपण ठणठणीत असून, दिल्लीला गेल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष सूरतच्या मार्गावर होते. सूरतच्या मार्गावर कोण असतात, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. १६ तारखेला महाविकास आघाडीची नागपूरला सभा आहे. तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष गुवाहाटीला बघायला मिळतील. मी अतिशय जबाबदारीने हे वक्तव्य करतोय, असा दावाही देशमुख यांनी केला. नागपूरला १६ तारखेला महाविकास आघाडीची सभा होत आहे. त्याची कोणतीही जबाबदारी प्रदेशाध्यक्षांनी घेतलेली नाही. आमच्या दुसऱ्या नेत्यांवर त्याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.