Asani cyclone : असनी चक्रीवादळ पोहोचले आंध्र प्रदेशमध्ये; समुद्र किनाऱ्यावर मुसळधार पाऊस

Asani cyclone : असनी चक्रीवादळ पोहोचले आंध्र प्रदेशमध्ये; समुद्र किनाऱ्यावर मुसळधार पाऊस
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : आंध्र प्रदेशमध्ये 'असनी' चक्रीवादळासंदर्भात इशारा दिलेला आहे. आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यातील काही भागांमध्ये बुधवारी सकाळी पाऊस सुरू झालेला आहे.'आयएमडी'च्या माहितीनुसार पुढील काही तासांमध्ये चक्रीवादळ वायव्य दिशेकडून वाढत जाणार असून, आंध्र प्रदेशजवळील बंगालच्या खाडीकडे सरकण्याची शक्यता आहे.

मंगळवारी ओडिशा आयुक्त प्रदीप कुमार जेना यांनी सांगितले होते की, "असनी चक्रीवादळ हे बुधवारी सकाळी आंध्र प्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यातील किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे."

वादळाचा परिणाम किनाऱ्यावरील रस्त्यांवर झालेला आहे. म्हणून वाहतूक दुसऱ्या दिशेने वळविण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये,  असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, असानी चक्रीवादळामुळे  पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यांच्या किनाऱ्यावरील भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० ते ११ मेपर्यंत पश्चिम बंगालच्या मध्य खाडीत, १०-१२ मेपर्यंत बंगालच्या वायव्य खाडीत मासेमारी करण्याचा मज्जाव केला आहे. समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना मागे फिरण्याच्या सूचना दिल्या आहेत. असानी चक्रीवादळ आज दुपारपर्यंत काकीनाडा-विशाखापट्टणम किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ : "नवनीत राणांची सिनेमात अधिक प्रगती होईल" – डॉ. नीलम गोऱ्हे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news