Arjun Kapoor : मलायकाला सोडून अर्जुन लंडनमध्ये ख्रिसमसला; सोबत ‘ती’ दिसली (video)
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानने वयाच्या ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा अभिनेत्री शौरा खानशी लग्न केलं. या लग्नाला अरबाजची पहिली पती बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा गेली नाही. दरम्यान मलायका एका ख्रिसमस पार्टी एन्जॉय करताना दिसली. तर मलायकाचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जून कपूर ( Arjun Kapoor ) मात्र, यावेळी तिच्यासोबत नव्हता. तर तो एका वेगळ्याच महिलेसोबत लंडनमध्ये ख्रिसमसचे सेलेब्रेशन करत आहे. अर्जुनसोबत असणारी 'ही' महिला कोण आहे हे पाहूयात…
संबंधित बातम्या
अभिनेत्री मलायका अरोराचा पहिला पती अरबाज नुकतेच ख्रिसमसच्या एक दिवस आधी लग्न बंधनात अडकला. या विवाह सोहळ्याला खान परिवारासोबत अनेक दिग्गज स्टार्सनी हजेरी लावली. मात्र, अरबाज खानची पहिली पत्नी अभिनेत्री मलायका अरोरा विवाहा ऐवजी ख्रिसमसच्या पार्टीत स्पॉट झाली. यावेळी तिने व्हाईट कलरच्या मिनी ड्रेसवर ब्ल्यू कलरचे फॉर्मल ब्लेझर परिधान केलं होतं. याच दरम्यान मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जून कपूर मात्र, तिला सोडून एका वेगळ्याच महिलेसोबत लंडनमध्ये दिसला.
दरम्यान अर्जून कपूरने ( Arjun Kapoor ) मोठ्या उत्साहात लंडनमध्ये यंदाचा ख्रिसमस साजरा केला. यावेळी त्याच्यासोबत मलायका नव्हती तर त्याने त्याची बहिण अंशुला कपूरसोबत ख्रिसमस साजरा केला. दरम्यान दोघां बहिण- भावाने मौजमस्ती करत मोठ्या उत्सावा प्रमाणे क्रिसमस साजरा केला. यावेळचे काही फोटो अर्जुनने सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कॉमेन्टस्चा पाऊस पाडलाय. अर्जुनसोबत बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटीया, सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणी, रविना टंडन , आलिया भट्ट- रणबीर कपूर आणि क्रिती सेनॉन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ख्रिसमस डे साजरा केलाय.
सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणी ख्रिसमस
बॉलिवू़ड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीने ख्रिसमसच्या सेलिब्रेशन करतानाचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये कियारा सिड दोघेजण खूपच रोमँटिक मूडमध्ये दिसले. फोटोत कियारा लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसली. तर लाल रंगाची पँट आणि काळ्या शर्टमध्ये सिद्धार्थ खूपच हॅडसम दिसत होता. कियाराने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "मेरी ख्रिसमस."
( video : viralbhayani instagram वरून साभार)