कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी के मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती झाली आहे. त्या उद्या बुधवार (दि.२३ ऑगस्ट) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.
कोल्हापूर महापालिकेतील आयुक्त पद २ जून पासून रिक्त आहे. यावरून मोठा राजकीय वाद पेटला होता. महापालिकेला तातडीने पूर्णवेळ आयुक्त मिळावेत अशी मागणी वेगवेगळ्या संघटनांकडून होत होती. अखेर मंजू लक्ष्मी यांची आयुक्तपदी निवड झाली आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी अखेर के मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने त्यासंदर्भात आज (मंगळवार) सकाळी आदेश काढले. के मंजुलक्ष्मी या सध्या सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या उद्या कोल्हापूर महापालिकेत कार्यभार स्वीकारतील.
2 जून 2023 रोजी तत्कालीन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. तब्बल अडीच महिन्यापेक्षा जास्त आयुक्त पद रिकामे असल्याने कोल्हापूरला आयुक्त मिळावा म्हणून आंदोलने ही झाली होती.
हेही वाचा :