Apple Vision Pro : Apple चा बहुप्रतीक्षित मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट ‘Vision Pro’ लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

apple vision pro
apple vision pro
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Apple Vision Pro : अखेर अ‍ॅपलचा बहुप्रतीक्षित मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट 'Vision Pro' लाँच झाला आहे. अ‍ॅपलच्या WWDC 2023 (वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फरन्स) कार्यक्रमात अ‍ॅपलच्या विविध नवीन प्रोडक्ट्सची मोठी रेंज लाँच केली आहे. यामध्ये अ‍ॅपलची नवीन ऑपरेटिंग सिस्टिम 17, वॉच ओएस 10, मॅकबूक एअर, इत्यादी प्रोडक्ट्सचा समावेश आहे. यावेळी अ‍ॅपलच्या बहुप्रतीक्षित मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट 'Vision Pro' देखील लाँच करण्यात आला आहे. अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांनी याला एक नवीन सुरुवात असे म्हटले आहे.

काय आहे 'Apple Vision Pro मिक्स्ड रिअ‍ॅलिटी' हेडसेट

Apple Vision Pro हा एक AR-VR हेडसेट आहे. यामध्ये यूजर्सना डिस्प्ले कमी अनुभवासह सर्व स्मार्ट फीचर्स मिळतील. यामध्ये ऑगमेंटंट रिअ‍ॅलिटी आणि मिक्स्ड रिअ‍ॅलिटीचा वापर करण्यात आला आहे. हा हेडसेट आभासी आणि वास्तविक जगाशी जोडते. हा हेडसेट वापरकर्त्यासमोर एक स्क्रीन सादर करतो. यामध्ये यूजरला मनोरंजनापासून ते गेमिंगपर्यंतचा उत्तम अनुभव मिळतो. यामध्ये यूजर्सना कोणत्याही डिस्प्लेची गरज नसून ते स्वतःसाठी कोणत्याही आकाराचा डिस्प्ले तयार करू शकतात. वापरकर्ते त्यांचा आवाज, हात आणि डोळ्यांनी ते वापरू शकतात.

हेडसेटच्या माध्यमातून एकाचवेळी पाहू शकता वास्तव आणि आभासी जग

Apple Vision Pro तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर लावायचा आहे. या हेडसेटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही फक्त डोळ्याच्या हालचालींद्वारे यातील गेम्स, व्हिडिओस, पाहू शकता खेळू शकता. हे थेट तुमच्या बुबुळाच्या हालचालींना कॅच करून यात बदल करू शकते. म्हणजे समजा तुम्ही आता एखादा व्हर्च्युअल शो पाहात आहात किंवा आभासी मिटिंग अटेंड करत आहात पण तुम्हाला यातून बाहेर पडून व्हर्च्युअल गेम खेळायचा असेल. तर तुम्ही फक्त डोळ्यांच्या माध्यमातून स्विच करू शकता. याशिवाय हातांचा आणि आवाजाच्या वापराने देखील तुम्ही याला स्वीच करू शकता.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही या हेडसेटच्या माध्यमातून तुम्ही एकाच वेळी आभासी जग आणि वास्तविक जग दोन्ही पाहू शकता. म्हणजेच जर तुम्ही हेडसेटवर एखादा आभासी कार्यक्रम पाहात असाल तर त्याचवेळी तुम्ही वास्तवात तुमच्या सभोवताली काय सुरू आहे हे देखील तुम्ही पाहू शकता. म्हणूनच Apple Vision Pro याला 'मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट' असे म्हटले आहे. हा हेडसेट तुम्हाला एकाच वेळी तुमचे भौतिक जग आणि डिजिटल आभासी जग यांच्याशी जोडून ठेवते. कंपनीने म्हटले आहे की ते डिजिटल आणि भौतिक जगात अखंडपणे काम करू शकते. तुम्ही Apple Vision Pro हेडसेटवर Apple Arcade गेम देखील खेळू शकता. पहिल्या दिवशी 100 हून अधिक आर्केड टायटल्स उपलब्ध होतील असा कंपनीचा दावा आहे.

हेडसेट बाजारात कधी उपलब्ध होईल

Apple Vision Pro हेडसेट पुढील वर्षाच्या सुरुवातीला 2024 मध्ये उपलब्ध होईल. अॅपल व्हिजन प्रो डिस्प्लेमध्ये दोन्ही डिस्प्ले 23 मिलियन पिक्सल आहेत. सानुकूल 3D लेन्स तुम्हाला रुंद रंग आणि HDR सपोर्टसह इमर्सिव्ह डिस्प्ले आणते. व्हिजन प्रो तुमच्या खोलीतील आणि आजूबाजूच्या पृष्ठभागांना मॅप करण्यासाठी ऑडिओ रे ट्रेसिंग वापरते.

काय असेल किंमत भारतात कधी होईल लाँच

Apple Vision Pro त्याची किंमत 3499 डॉलर्स म्हणजेच सुमारे 2 लाख 88 हजार 724 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, भारतात हा हेडसेट कधी लाँच होईल किंवा त्याची भारतात किंमत काय असेल हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.

वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवताना गोपनीयता देखील सुनिश्चित करते

Apple Vision Pro ला झटपट लॉक/अनलॉक करण्यासाठी OpticID तुमची बुबुळ वापरते. तुमचा सर्व वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवताना हे हेडसेटवरील गोपनीयता सुनिश्चित करते. तुम्ही कुठे पाहता ते खाजगी राहते, याचा अर्थ हेडसेट वापरताना तुम्ही कुठे पाहत आहात हे अॅप्स आणि वेबसाइटना कळू शकत नाही.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news