पुढारी ऑनलाइन डेस्क : Anupam Kher Mother : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या वादात आता अनुपम खेर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी त्यांच्या आईचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये नरेंद्र मोदींच्या शिक्षणावर प्रश्न विचारले असता त्या एकदम भडकल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तसेच त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्री सर्टिफिकेट दाखवण्याची मागणी माहिती अधिकार कायद्यांतर्गत केली होती. मात्र, गुजरात न्यायालयाने पंतप्रधानांना त्यांची डिग्री दाखवण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीची सर्वत्र चर्चा होत आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी सध्या तुरुंगात असलेले आपचे नेते मनिष सिसोदिया यांनी देखील तुरुंगातून पत्र लिहून मोदींच्या डिग्रीविषयी टिप्पणी केली होती. तसेच 21 व्या शतकात 135 कोटी देशवासियांचे पंतप्रधान शिकलेले असावे, असे मत त्यांनी मांडले होते.
आता या प्रकरणात अनुपम खेर यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांच्या आईचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोदींना त्यांचे शिक्षण विचारणाऱ्यांवर अनुपम यांच्या आई दुलारी चांगल्याच भकडलेल्या दिसत आहे.
या व्हिडिओत दुलारी यांना विचारले जात आहे की आजकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणावर प्रश्न केले जात आहे. लोक असे म्हणत आहेत की ते शिक्षित नाहीत. असे विचारताच दुलारी या चांगल्याच भडकल्या. कोण आहे ते जे मोदीजींना त्यांची डिग्री विचारत आहेत. त्यांच्या सारखे 10 शिकलेल्यांना मोदी स्वतः शिकवू शकतात. जे आज कोट्यवधी जनतेला घर देत आहे, त्यांच्यासाठी काम करत आहेत त्यांना तुम्ही शिक्षण विचारता. ते तुमच्यासारख्या कितीतरी जणांना शिकवतील, असे त्या म्हणाल्या.
त्यांच्या हा व्हिडिओ अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्यावर लाइक्स कमेंट्स पडत आहे. काहींनी त्यांना मोदी भक्त ठरवले आहे. तर काहींनी त्यांच्या या बेधडक उत्तराची स्तूती केली आहे.
हे ही वाचा: