Budget 2024 : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच : अनिल देशमुख

अनिल देशमुख
अनिल देशमुख

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारामण यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अंतरीम अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या समोर असलेल्या प्रश्नासंदर्भात पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ( Budget 2024 )

संबधित बातम्या

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठीची घोषणा अर्थसंकल्पात आज परत करण्यात आली. परंतु, जो माल शेतकरी बाजारात आणतात त्याला भाव मिळत नाही. देशात मोठया प्रमाणात उत्पादन होवून सुद्धा विदेशातून कापुस, तेल, दाळ आयात करण्यात येते. याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात कर्ज देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

परंतु, बाजारात शेतमालास भाव मिळत नसल्याने त्याच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. यामुळे देशात मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. एकूणच आजच्या अंतरीम अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदारात काहीच पडले नाही. व्यापारी, गरीब, सामान्य नागरिक यांना सुध्दा कोणताही दिलासा देण्यात आला नसल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news