Anand Mahindra Share Video : ‘इडली फॅक्टरी’वर उद्योगपती आनंद महिंद्रा ‘फिदा’, म्हणाले…

Anand Mahindra Share Video : ‘इडली फॅक्टरी’वर उद्योगपती आनंद महिंद्रा ‘फिदा’, म्हणाले…

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. त्यांच्या चाहतावर्ग न चुकता त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओ पाहत असतो. ते नेहमीच काहीतरी नवीन आणि मजेदार असे ट्विट पोस्ट करत असतात. त्यांनी त्यांच्या पोस्टमधून दिलेली माहिती ही लाखमोलाची जीवनातील मूल्ये सांगून जातात. सध्या त्यांनी ट्विटद्वारे पोस्ट केलेली एक व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांची नजर खिळवून ठेवत आहे. इडली बनवणाऱ्या एका खाद्यगृहाचा हा व्हिडिओ आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. . स्वत: आनंद महिंद्रा यांनी दिलेल्या कमेंटची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. (Anand Mahindra Share Video)

इडली हा दक्षिणात्य पदार्थ.  तांदळाचे पीठ भिजवून तयार केला जाणारा हा पदार्थ देशातील अनेक भागांमध्ये प्रसिद्ध आहे.  इडली बनविण्याच्या सामग्रीमध्ये आवश्यक ती भांडी असणे खूप महत्त्वाचे असते. हा पदार्थ बनविण्यासाठी विशेष असे भांडे देखील आहे जे साच्याच्या स्वरुपात पाहायला मिळते. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओतील साचा म्हणजेच भांडी ही वेगळीच असल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे इडली फॅक्‍टरीच्‍या या व्हिडिओतील व्यक्ती एकावेळी सुमारे १०० ते २०० इडली बनवत असल्याचे दिसून येते. ही एवढी मोठी इडलीसाठीची भांडी देखील काहीजणांनी पहिल्यांदाच पाहिली असतील. या व्हिडिओतील इडली करण्याची पद्धत पाहूनअनेकांनी आश्चर्य व्‍यक्‍त केले आहे. (Anand Mahindra Share Video)

आनंद महिंद्राच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर इडली बनवताना दिसत आहे. प्रथम तो इडलीसाठी पीठ तयार करतो आणि नंतर इडलीच्या साच्यात ओततो. त्यानंतर काही वेळातच साच्यांमधून एक व्यक्ती या इडल्या काढत असतो. या इडल्यांचा थर पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे व्हिडिओतील इडली या अगदी स्पंज असल्याचा भास पाहणाऱ्याला होतो; पण त्या इडलीच आहेत. त्याचबरोबर इडलीसोबतची चटणी देखील करण्याची पद्धत पाहण्यासारखी आहे.

महिंद्रा यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला हा प्रश्न पडत असेल की, या इडलीवाल्याचा रोजचा खप किती असेल? काहींना तर ही इडली कोठे मिळते असा प्रश्न पडला आहे. व्हिडिओच्या शेवटी, इडली तयार करणारी व्यक्ती एका गायीला इडली खाऊ घालताना दिसते. या संपूर्ण व्हिडिओतून व्यवसायाच्या विविध पद्धती आणि प्राणीमात्रांवरचं प्रेम शिकण्यासारखे आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी स्पर्श…

आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओला दिलेले कॅप्शन देखील चर्चेत आहे. ते म्हणतात की, 'एकीकडे इडली अम्मा आहेत जी मेहनतीने प्रत्येक इडली हळूहळू तयार करतात आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर इडली तयार करण्यासाठी साधने आहेत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी स्पर्श आहे. पूर्णपणे भारतीय. जिथे काम चालू असताना गाईला इडली खाऊ घालून प्रेम व्यक्त केले जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news