आनंद एल. राय लवकरच करणार एका मोठ्या प्रोजेक्टची घोषणा!

आनंद एल. राय
आनंद एल. राय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : आनंद एल. राय आणि कलर यलो प्रॉडक्शनच्या 'तनु वेड्स मनू', 'निल बट्टे सन्नाटा', 'तुंबड', 'शुभ मंगल सावधान', 'एक अॅक्शन हिरो', 'रांझना' ज्यांना फिल्मफेअर अवॉर्ड्स नाईटमध्ये सात नामांकन मिळाले आहेत. दरम्यान आनंद एल. राय हे पुन्हा एका मोठ्या प्रोजेक्टची घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

२०२३ साठी यांच्याकडे 'आत्मपॅम्फ्लेट' हा चित्रपट आहे. जो बर्लिन चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला असून चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 'फिर आयी हसीन दिलरुबा' आणि प्रादेशिक चित्रपट 'झिम्मा २' लवकरच येणार आहेत. आगामी प्रकल्पांची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. आनंद एल. राय यांच्या जवळच्या एका स्रोताने याबाबतची माहिती दिली आहे.

आनंद एल. राय
आनंद एल. राय

यात सांगितले आहे की, 'एकाहून अधिक घोषणांवर एकाच वेळी काम केलं जात आहे. आजच्या काळातील काही मोठी नावे आधीच समोर आली आहेत आणि घोषणा लवकरच होणार आहेत. चाहते काही खरोखरच उत्तम आणि मनोरंजक प्रोजेक्ट्सची अपेक्षा करू शकतात. लवकरच काहीतरी बघायला मिळणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news