मुंबईत पालिकेच्या बंद शाळेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट

सिलेंडरचा स्फोट
सिलेंडरचा स्फोट

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबईतील काळाचौकी परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळेमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाने दिली आहे.

या स्फोटामध्ये तब्बल 6 ते 7 ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला आहे. स्फोटाने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या चार गाड्या दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्‍न सुरु आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news