Amitesh Kumar: अमितेशकुमार पुणे शहराचे नवे पोलिस आयुक्त: रितेशकुमार यांची बदली

Amitesh Kumar: अमितेशकुमार पुणे शहराचे नवे पोलिस आयुक्त: रितेशकुमार यांची बदली
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अमितेशकुमार यांची पुणे शहर पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर पोलिस आयुक्त पदावरून त्यांची पुणे शहर येथे बदली करण्यात आली आहे. तर रितेशकुमार यांची पदोन्नोतीने डिजी होमगार्ड म्हणून बदली करण्यात आली. याबाबतचे गृहविभागाने बुधवारी (दि.३१) आदेश दिले आहेत.

कोण आहेत अमितेश कुमार

नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतलेले अमितेश कुमार कायदा आणि सायबर कायद्यात पदव्युत्तर पदवीधर आहेत. अमितेश कुमार हे १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अमितेश कुमार हे नागपूर आणि मुंबईचे पोलिस उपायुक्त, सोलापूर आणि औरंगाबाद (ग्रामीण) पोलिस अधीक्षक, अमरावतीचे पोलिस आयुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त (एटीएस), आणि विशेष पोलिस महानिरीक्षक (औरंगाबाद परिक्षेत्र) म्हणून काम केले आहे.

तसेच त्यांनी केलेल्या कामगिरी बद्दल त्यांना राष्ट्रपती पदक सुद्धा देण्यात आले आहे. बिहारमधून नक्षलवाद्यांसाठी आंध्र प्रदेशात होणारी शस्त्राची तस्करीही त्यांनी उघड केली होती. एक धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांनी येथे आपली ओळख निर्माण केली आहे. आता त्यांच्या पुण्यातील कार्यकीर्दीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती

अमितेश कुमार यांनी २००५ ते २००७ या दरम्यान नागपूर येथे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी क्रिकेट विश्वात भूकंप घडवला होता. नागपुर येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना होता आणि वेस्ट इंडिजची टीम हॉटेल प्राईड मध्ये थांबली होती. अष्टपैलू खेळाडू मरलोन सॅम्युअल यांच्यासाठी हॉटेल प्राइडच्या लँडलाईनवर वारंवार कॉल येत असल्याचे लक्षात आल्यामुळे तत्कालीन पोलिस उपायुक्त अमितेश कुमार यांनी त्यावर लक्ष ठेऊन होते.

अंडरवर्ल्ड डॉन तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा क्रिकेट बॅटिंगचा जगभरात गोरखधंदा सांभाळणारा राईटहॅण्ड मुकेश कोचर हा दुबईतुन मॅच फिक्सिंग साठी वारंवार मरलोन सोबत संपर्क करत होता. हे लक्षात आल्यामुळे अमितेश कुमार यांनी हे संभाषण टेप करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. नंतर देश-विदेशातील तपास यंत्रणांनी या प्रकरणावर लक्ष वेधले होते. नागपूर पोलिसांच्या तपासाच्या आधारे आयसीसीने मार्लोन सॅम्युअल्स याच्यावर दोन वर्षाची बंदीही घातली होती."

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news