आलियाचा ‘डार्लिंग’!

आलियाचा ‘डार्लिंग’!
आलियाचा ‘डार्लिंग’!

शीर्षक वाचल्यावर अनेकांना रणबीर कपूर आठवला असेल; पण तसे काही नाही. आलिया आणि तिचा 'डार्लिंग' रणबीर सध्या आपापल्या चित्रपटांमध्ये मश्गुल आहेत. इथे ज्या 'डार्लिंग'चा उल्लेख केला आहे तो आलियाचा चित्रपट आहे. तिच्या होम प्रॉडक्शनचा हा पहिलाच चित्रपट असून, तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

आलियाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत ही घोषणा केली. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मात्र अद्याप स्पष्ट केलेली नाही. कॅप्शनमध्ये आलियाने लिहिले आहे, 'हाय डालिर्र्ंग्ज, लवकरच भेटू!' हा एक डार्क कॉमेडी चित्रपट असून, त्याची कथा आई व लेकीभोवती फिरणारी आहे. आलियाशिवाय यामध्ये शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाद्वारे जस्मित के. रीन यांनी दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news