मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरात आज अक्षय, अमृता देशमुख आणि अपूर्वा चर्चा करताना दिसणार आहेत. ज्यामध्ये ते एकदंरीतच प्रसादच्या स्वभावाबद्दल बोलताना दिसणार आहेत.
अक्षयचे म्हणणे आहे की, सगळी फेक चेहरे बाहेर येणारच. म्हणून तर मागच्या वेळेस म्हंटलं ना इमोशन्स घेऊन फिरत असतो. फक्त काही झालं कि रडायचं. गेममध्ये काही सुधारणा नाही. ते खोटं वाटतं सगळं. यावर अपूर्वाचे म्हणणे आहे की, तो पूर्णतः इमोशनलेस माणूस आहे, अहंकारी आणि आक्रमक आहे, एकाही व्यक्तीचा तो खरा नाहीये. मी त्याला कुठे खरा मानला असता माहिती आहे.
अमृता देशमुख म्हणाली, नाहीच आहे आणि माझी तशी अपेक्षा पण नाहीये पहिल्या दिवसापासून. कारण त्याचा मला इतका त्रास झाला असता ना प्रत्येक नॉमिनेशनमध्ये. यावर अपूर्वा म्हणाली की, मी एक थर्ड पर्सन म्हणून विचार करते आहे. त्यावर अमृता देशमुख म्हणाली, मला पण असं वाटत, मी बोलून देखील दाखवलं आहे.
हेही वाचलंत का?