मंचर : पुढारी वृत्तसेवा ; मंचर (ता. आंबेगाव) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकाच मोटारीतून प्रवास केला.
संबंधित बातम्या
अजित पवार मंचर येथे आले असता वळसे-पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, उद्योजक देवेंद्र शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. नंतर पवार, वळसे-पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकाच मोटारीतून प्रवेश केला. महत्त्वाचे म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेत असून, शिरूर मतदारसंघातून ते राष्ट्रवादीकडून लढणार असल्याची चर्चा आहे.
त्यातच त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत प्रवास केल्याने चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, वळसे-पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, उद्योजक देवेंद्र शहा, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह अजित पवार यांनी दुपारचे भोजन एकत्र केले.