माेठी बातमी: अजित पवार राजभवनात दाखल; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

माेठी बातमी: अजित पवार राजभवनात दाखल; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली; परंतु यानंतर अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक नेते असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar)  विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राजभवनाकडे रवाना झाले असल्‍याचे वृत्त आहे. दरम्यान, अजित पवार समर्थक आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. देवगिरीवर झालेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड वगळता इतर नेते उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news