Ajay Jadeja : अफगाणिस्तानकडून पाकचा लाजीरवाणा पराभव अन् प्रशिक्षक जडेजा यांची कळी खुलली

Ajay Jadeja
Ajay Jadeja

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानने यंदाच्या विश्वषकात मोठा इतिहास रचला आहे. इंग्लंडपाठोपाठ पाकिस्तानचा पराभव करत अफगाणिस्तानने मोठा उलटफेर केला आहे. बंगळूरच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकने अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे अफगाण संघाने आपल्या चिवट फलंदाजीच्या जोरावर पार केले आणि 8 विकेट्स राखून सामना खिशात घातला. (Ajay Jadeja)

दरम्यान, अफगाणिस्तानच्या या विजयानंतर प्रशिक्षक अजय जडेजा यांच्यावर सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अफगाणिस्ताकडून उलटफेर होताच अजय जडेजांच्या चेहऱ्यावरील हास्य सर्वकाही सांगून जात होते. भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने या विजयाचे श्रेय अजय जडेजा यांना दिले आहे. (Ajay Jadeja)

अफगाणी सलामीवीरांची धमाकेदार सुरुवात 

283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तान संघाला सलामीवीर झद्रान आणि गुरबाज यांनी धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पाक गोलंदाजांवर एकापाठोपाठ आक्रमण चढवले. या दोघांनी पॉवरप्लेच्या 10 षटकांत 60 धावा केल्या. शाहीनच्या पहिल्याच षटकात 10 धावा वसूल केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या- चौथ्या-पाचव्या आणि सहाव्या षटकात एकूण 16 जमा केल्या. सहाव्या षटकात पंचांनी झद्रानला बाद घोषित केले. अशा परिस्थितीत डीआरएसने त्याला वाचवले. जीवदान मिळाल्यानंतर आठव्या षटकात झद्रानने गुरबाजसह हरिस रौफच्या एका षटकात 17 धावा चोपल्या. या दोघांनी हरिसच्या एका षटकात चार चौकार मारले. हीच फटकेबाजीची लय दोघांनी काय ठेवली आणि पहिल्या विकेटसाठी 130 धावांची भागिदारी रचली. (Ajay Jadeja)

अफगाणिस्तानची पहिली विकेट 130 धावांवर पडली. शाहीन आफ्रिदीने रहमानउल्ला गुरबाजला बाद केले. गुरबाजने 53 चेंडूत 65 धावा केल्या. ओसामा मीरने त्याचा झेल घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रहमत शाहने आणि इब्राहिम झद्रानला खंबीर साथ दिली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचली. झद्रान त्याच्या शतकाच्या जवळ पोहचला होता पण 13 धावांनी त्याला हुलकावणी मिळाली. तो 87 धावांवर बाद झाला. 190 धावांवर अफगाणिस्तानची दुसरी विकेट पडली. हसन अलीने झद्रानला मोहम्मद रिझवानकरवी झेलबाद केले.

कर्णधार हशमतुल्लाह शहीदी मैदानात उतरला. त्याने शाह सोबत संयमी खेळी केली. ज्यामुळे अफगाणिस्तानच्या धावसंख्येने दोन गडी गमावून 200 धावा पार केल्या. दोघांनी चांगली भागीदारी करून संघाला हळूहळू लक्ष्याच्या जवळ नेले आणि आणि अखेर 49 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शहीदीने चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केला. (Ajay Jadeja)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news