Air India fined : प्रवाशाने विमानात धुम्रपान केल्याने एअर इंडियाला १० लाख रुपयांचा दंड

AIR INDIA
AIR INDIA

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ते दिल्ली या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान कंपनीला दंड ठोठावला आहे. कंपनीने डीजीसीएला या घटनेची माहिती न दिल्यामुळे आणि कंपनीच्या अंतर्गत समितीनेही या प्रकरणाची उशिरा दखल घेतल्याच्या कारणास्तव डीजीसीएने विमान कंपनीला दंड ठोठावला आहे. यानुसार डीजीसीएने एअर इंडियाला दहा लाख रुपये इतका दंड ठोठावला आहे.

6 डिसेंबर रोजी पॅरिसहून नवी दिल्लीला जाणाऱ्या AI-142 विमानामध्ये प्रवाशांच्या गैरवर्तनाची घटना डीजीसीएच्या निदर्शनास आली होती. यामध्ये एक प्रवासी मद्यधुंद अवस्थेत टॉयलेटमध्ये धुम्रपान करताना आढळून आला. तसेच त्याने कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन न केल्याने त्याला पकडण्यात आले. यानंतर या व्यक्तीने एका महिलेच्या ब्लँकेटवर लघुशंका देखील केली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पॅरिसहून आलेले AI-142 हे विमान सकाळी ९.४० वाजता दिल्लीत उतरले. घडलेल्या प्रकाराबाबत पीडित महिलेने विमानतळ सुरक्षेला माहिकी दिली की, आरोपी प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता आणि केबिन क्रूच्या सूचनांचे पालन करत नव्हता. त्यानंतर त्याने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली. नंतर दिल्लीत सीआरपीएफने त्याला पकडले पण दोन प्रवाशांमध्ये तडजोड झाल्यानंतर आरोपी प्रवाशाला सोडण्यात आले. लेखी माफी मागितल्यानंतर आरोपीला सोडून देण्यात आले.

ही घटना 6 डिसेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट 142 मध्ये घडली होती. विशेष म्हणजे या घटनेनंतर विमानाच्या पायलटने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे (एटीसी) तक्रार केली होती, त्यानंतर आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली होती, परंतु महिलेने लेखी माफी मागितल्यानंतर त्यांनी कोणताही एफआयआर नोंदवला नाही तसेच आरोपीची सुटका देखील केली.

डिजीसीए मार्फत एअर इंडियाला नोटीस

या संपूर्ण प्रकरणाची ६ डिसेंबर रोजी, DGCA ने एअर इंडियाच्या लेखा व्यवस्थापकाला कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटिशीला उत्तर म्हणून एअर इंडियाने 23 जानेवारी 2023 रोजी उत्तर दिले. त्यानंतर याची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे. DGCA ने एअर इंडियाला या घटनेची माहिती न दिल्याने आणि प्रकरण त्यांच्या अंतर्गत समितीकडे पाठवण्यास उशीर केल्याबद्दल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news