Dr. Bhaskar More : रत्नदीप मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

Dr. Bhaskar More
Dr. Bhaskar More

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : मागील चार दिवसांपासून रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी डॉ. भास्कर मोरे यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी तहसील कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. याच अनुषंगाने अखेर विद्यार्थींनीच्या फिर्यादीवरून डॉ. भास्कर मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Dr. Bhaskar More

पीडित विद्यार्थिंनीने दिलेल्या फीर्यादीत म्हटले आहे की, डॉ. भास्कर मोरे यांनी पीडित मुलीस कॉलेजच्या प्रिन्सिपल ऑफिसमध्ये बोलवून घेतले. तसेच ऑफिसच्या ॲंटी चेंबरमध्ये तिच्याशी अश्लील चाळे केले. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. Dr. Bhaskar More

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर च्या अध्यक्षानेच कॉलेजमधील विद्यार्थिनीवर केलेल्या विनयभंगाच्या घटनेमुळे विद्यार्थी व जामखेड मधील विविध संघटनानकडून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव तपास करीत आहेत.

Dr. Bhaskar More या पूर्वीही दाखल झाला होता विनयभंगाचा गुन्हा

रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूरचे संस्थापक अध्यक्ष यांच्या विरोधात मागील वर्षी देखील कॉलेजमधील मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या चार दिवसांपासून  मोरे यांच्या विरोधात शेकडो विद्यार्थ्यांचे  आंदोलन सुरू आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत हे देखील विद्यार्थींसमवेत उपोषणास बसले आहेत. उपोषण स्थळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रिपब्लिकन पक्ष जामखेड तालुका वकील संघ यांनी देखील जाहीर पाठिंबा दिला आहे.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू उपोषणस्थळी येत नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच

प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेत मुलींच्या तक्रारीसाठी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाची नियुक्ती केली होती. तरी विद्यार्थी डॉ भास्कर मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यावर ठाम होते. आखेर रात्री उशिरा  मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,  पुणे विद्यापीठाचे  कुलगुरू उपोषणस्थळी येत नाहीत, तो पर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील, असा ठाम निश्चय विद्यार्थ्यांनी केला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news