Salman Khan : खुशखबर! ‘टायगर ३’ नंतर सलमान खान आणखी एका चित्रपटासाठी सज्ज!

tiger 3 - salman khan
tiger 3 - salman khan

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा भाईजान आणि अभिनेता सलमान खान ( Salman Khan ) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या सलमान त्याच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटासाठी त्याने कंबर कसली असून जोरदार शूटिंगला सुरूवात केली आहे. 'टायगर ३' या चित्रपटानंतर पुन्हा सलमान पडद्यावर दिसणार असल्याने त्याच्या चाहत्याचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

संबंधित बातम्या 

मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच बॉलिवूड अभिनेता सलमान खान ( Salman Khan ) दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्यासोबतच्या आगामी चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. दरम्यान गेल्या वर्षी सलमान आणि सूरज बडजात्या यांनी २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाच्या सीक्वल घेवून येणार आहे. दोघेजण ८ वर्षानंतर पुन्हा एकदा ते त्यांच्या पाचव्या चित्रपटासाठी पुन्हा एकत्रित येणार आहेत. सलमान या चित्रपटासाठी पुढील २६ महिने बिझी आहे. मोठ्या पडद्यावर पुन्हा सलमान दिसणार असल्याने चाहत्याचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

सलमान आणि सूरज बडजात्या यांच्या जोडीने अनेक बॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपट गाजवली आहेत. यामध्ये 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ हैं' आणि 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटांचा समावेश आहे. यानंतर सलमान खान आणि सूरज बडजात्या यांच्या पुढील प्रोजक्टची चाहते आतुरतेने वाट होते. यानंतर 'प्रेम रतन धन पायो' चा सीक्वलवर काम केलं जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news