सत्तेत आल्‍यास तुमच्‍या प्रत्‍येक घाेटाळ्याची फाईल बाहेर काढणार : आदित्य ठाकरेंचा इशारा

आदित्‍य ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )
आदित्‍य ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई महापालिकेत झालेल्‍या विविध घोटाळ्यांची चौकशी करा. त्याचबरोबर ठाणे, नागपूर या जिल्ह्यांत झालेल्‍या विविध विकास कामांची चौकशी करण्‍यात यावी, अशी मागणी करत राज्यात अत्यंत घाणेरडे राजकारण सुरु आहे. सरकारच्या चोरीची फाईल तयार आहेत. सत्तेत आल्‍यास तुमच्‍या प्रत्‍येक घाेटाळ्याची फाईल बाहेर काढू, असा आव्‍हान आज ( दि. १ ) ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे त्यांनी राज्‍य सरकारला दिले.

आदित्य ठाकरे यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली आज मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्‍यात आला. यामध्‍ये ठाकरे गटाच्या नेत्यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांशी संवाद साधला. त्‍यांनी राज्‍य सरकारला धारेवर धरले. (Aditya Thackeray Mumbai Morcha)

मेट्रो सिनेमेजवळ आदित्य ठाकरे मोर्चात सहभागी झाले. ते सहभागी झाल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. पावसाची रिपरिप सुरु असतानाही या मोर्चाला मुंबईकरांचा पाठिंबा पाहायला मिळाला. या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ही खोके सरकारची भुतं पळवून लावा. हे भगवं वादळ दिसतय ती शिवसेनेची ताकद आहे. समझनेवालो को इशारा काफी आहे असं म्हणत ठाकरे गटाच्या मोर्चावर लक्ष केंद्रित केले.

सरकारच्या चोरीची फाईल तयार : आदित्य ठाकरे

मुंबईत अनेक घोटाळे सुरु आहेत. या घोटाळ्यांची चौकशी करा. सरकारने ५० रस्त्यांची यादी दिली आहे. खरंतर त्यांच्यासाठी ५० आकडा खूप महत्त्वाचा आहे.  यातील एकही रस्ता पूर्ण झाला नाही. तुम्ही कोणासाठी काम करत आहात मुंबईसाठी की खोके सरकारसाठी, असा सवाल त्यांनी सत्ताधारी गटावर केला. मुंबईला महापौरही नाहीत आणि नगरसेवकही नाहीत. मुंबईतील घोटाळ्यांची चौकशी करा. त्याचबरोबर ठाणे, नागपूर या जिल्ह्यांची देखील चौकशी करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. राज्यात अत्यंत घाणेरडे राजकारण सुरु आहे. सरकारच्या चोरीची फाईल तयार आहे. आयपीएस अधिकाऱ्यांचं रेकॉर्डिंग आम्ही लवकरच दाखवू, असा इशारा त्‍यांनी दिला.

आता तर पिक्चर सुरु झाला : संजय राऊत

या वेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील संवाद साधला. या मोर्चातील गर्दीवर लक्ष केंद्रित करत ते म्हणाले की, मला असा वाटतंय की, आता पिक्चर सुरु झाला आहे. ही मुंबई शिवसेनेची आहे आणि गेली कित्येक वर्षे ही शिवसेनेकडेच आहे. या मोर्चात किती ताकद आहे हे सर्वजण पाहत असतील, असं म्हणत त्‍यांनी सत्ताधारी गटावर निशाणा साधला.

गेली ४-५ टर्म महापलिकेवर शिवसेनेचा भगवा : अनिल देसाई

यावेळी ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई म्हणाले की, गेले ४-५ टर्म महापलिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे आणि पुढेही फडकत राहणार आहे. प्रशासकांच्या माध्यमातून किवा प्रशासकावर दबाव टाकून राज्‍य सरकार काम करत आहे. मुंबई पालिकेला लुटण्याचा प्रयत्न सुरु आहे; पण शिवसेना हे मुळीच होऊ देणार नाही. वर्ष झाले लोकप्रतिनिधी नाही आणि प्रशासकाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून षड्यंत्र जे झाले आहे ते सर्व आज आदित्य ठाकरे मुंबई समोर ठेवणार आहेत, असेही त्‍यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news