पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही मालिका आणि बिग बॉस फेम उर्फी जावेद ( Urfi Javed ) तिच्या वेगवेगळ्या फॅशन स्टाईलने सर्वानाच आश्चर्यचकित करत असते. यामुळे कधी तिचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक केलं जाते. तर कधी तिला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र, या गोष्टीचा उर्फीला काडीमात्र फरक पडत नाही. याशिवाय ती नेहमी तिच्या हटके तोकड्या कपड्याची स्टाईल करत असते. सध्या तिने तिच्या स्वत: च्या ड्रेसमध्ये संपूर्ण ब्रह्मांड अवतरले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या
नुकतेच अभिनेत्री उर्फी जावेदने ( Urfi Javed ) तिच्या इंन्स्टाग्रामवर तिच्या हटके स्टाईलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिने ब्लॅक रंगाचा मिनीशॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. मात्र, जेव्हा उर्फी पॉपाराझीच्या कॅमेऱ्या समोर आली तेव्हा तिच्या ड्रेसमध्ये संपूर्ण ब्रह्मांड अवतरले असल्याचे दिसले. यात तिने आकाशगंगेतील संपूर्ण ग्रह, तारे सभोवती फिरताना दिसत आहेत. तिच्या नव्या लूकमुळे चाहत्यांच्या नजरा तिच्यावर नजरा खिळल्या आहेत. या व्हिडिओला तिने "Centre of the universe ? ?, For @primevideoin announcing my show 'Follow kar lo yar''. अशी कॅप्शन लिहिली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती स्वत: ला 'सेंटर ऑफ यूनिव्हर्स' असल्याचे म्हटलं आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. .यात एका युजर्सने लिहिले की, 'ब्रह्मांड धोक्यात आहे.' तर दुसऱ्या एकाने, 'ती सर्वांना आश्चर्यचकित करण्यात कधीही अपयशी ठरत नाही, 'हे भगवान!! अवतार घे, देश मोठा संकटात आहे. असे म्हटलं आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केलं आहेत.
काही दिवसांपूर्वी उर्फीने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिचे ओठ सुजलेले दिसत होते. यावरून उर्फीचे चाहते तिच्या तब्येतेची काळजी करत होते. याशिवाय उर्फी तिच्या नवनविन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.