पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) हिला कोण बंर ओळखत नाही. तिने मराठीसोबत अनेक हिंदी चित्रपटात भारदस्त अभिनय साकारला. याशिवाय ती लावणी परफार्मन्स सादर करण्यातही माहूर आहे. तिच्या एकापेक्षा एक चित्रपटातील लूक असो वा सोशल मीडियावरील वेस्टर्न- मराठमोळा लूक असो चाहते तिच्या प्रेमात आकंठ बुडालेत. सोनालीच्या परदेशातील वेस्टर्न लूकदेखील खूपवेळा समोर येत असतो. सध्या मात्र, सोनालीचा जांभळ्या रंगाच्या सिल्क साडीतील लूक समोर आलाय.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ( Sonalee Kulkarni ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर जांभळ्या रंगाच्या सहावारी साडीत काही हॉट फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या जांभळ्या साडीसोबत तिने त्याच रंगाचे मॅचिंग ब्लॉऊजही परिधान केलं आहे. केसांचा अंबाडा आणि त्यावर गजरा, गळ्यात मोत्याचा हार, कानात इअररिग्स, कपाळावर टिकली, हातात घड्याळ, मेकअप आणि लिपस्टिक तिने लूक पूर्ण केलाय. सौदर्यांसोबत तिच्या चेहऱ्यावरील हसू आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
साडीवरील प्रेम दाखवत तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'My silk love ?' असे लिहिलंय. कधी भर उन्हात उभारून तर कधी भिंतीच्या शेजारी उभारून तिने एकापेक्षा एक हॉट फोटोला पोझ दिलीय. सोनालीचे हे फोटो एका कार्यक्रमाच्या लॉन्चिंग सोहळ्या दरम्यानचे आहेत. हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
'Sunder ?', 'Pretty woman ??', 'Gorgeous', 'सौंदर्याची खाण ??', 'Saree plus Sonalee ?? love love', 'Beautiful ?', 'खुप सुंदर सोनाली ताई.. मोत्यांची माळ आणि साडी वर सोनेरी बुट्या…?❤️', 'Wao So beautiful looking pretty, Ufffffffs !!!' , 'ur nature is hot and not makeup'. यासारख्या अनेक कॉमेन्टस सोशल मीडियावरील युजर्सनी केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि हास्याचे भरभरून ईमोजी शेअर केले आहेत.