Rajeshwari Kharat : डान्स केला शालूने, पण सगळे शोधताहेत जब्याला ? (Video)

Rajeshwari Kharat : डान्स केला शालूने, पण सगळे शोधताहेत जब्याला ? (Video)

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'फँड्री' या चित्रपटातून मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात ( Rajeshwari Kharat ) चर्चेत आली होती. या चित्रपटात तिचा एकही डॉयलॉग नव्हता. परंतु, तिची शालूची भूमिका चाहत्याच्या मनात घर करून गेली. यातील शालू आणि जब्याची जोडी आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. या चित्रपटातील 'काळ्या चिमणीची राख गावली काय लेका…' हा जब्याचा डॉयलॉग खूपच फेमस झाला. जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ आवघडे याने उत्तमरित्या साकारली होती. तर राजेश्वरीने या चित्रपटात शालूची भूमिका साकारली होती. राजेश्ववरीपेक्षा शालू या नावानेच तिला ओळखले जाते. चित्रपटातील अभिनयासोबत राजेश्वरी सोशल मीडियावरही सक्रिय असते. आता तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामुळे चाहते तर घायाळ झालेचं आहेत. पण, नेटकरी मात्र जब्याला शोधत आहेत.

अभिनेत्री राजेश्वरी खरातने ( Rajeshwari Kharat ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक ब्ल्यू- पिंक कलरच्या घागरा- चोळीतील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राजेश्वरी हिरव्या गार शेतात असून उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या 'जरा जरा..सरकी चुनरिया रे' या हिंदी गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसली आहे. 'कोरा- कोरा मन है. कोरा हे मन, बस तेरा नाम ही लिखा… जरा जरा' असे हिंदी गाण्याचे बोल व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला वाजत आहे. यातील खास म्हणजे, खूपच दिवसांनी राजेश्वरी पारंपरिक लूकमध्ये चाहत्यांच्या समोर आली आहे.

केसांचा आंबडा, केसात गजरा, कपाळावर बिंदी, नाकात नथ, कानात मोठे झुमके, हातात हिरव्या- सोनेरी रंगाच्या बांगड्या, गळ्यात भरगच्च नेकलेस आणि मोठे घटंन, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'Zara Zara .. ????'. असे लिहिले आहे. यातील खास करून राजेश्वरीने पिंक कलरची ओढणीनं चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओत राजेश्वरीच्या सौदर्यांची जादू आणि निसर्ग सौदर्यं दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ चाहत्याच्या पंसतीस उतरला आहे.

'जब्या कुठ हाय बाबा तू, ती काळी चिमणी दे आणून आम्हाला पण..?', 'किराया अडवाणीच्या लग्नातुत थेट शेतात…', 'मला काळ्या चिमणीची राख गावली हाय… बाजूला व्हा समदी ????', 'अप्रतिम…??', 'Khup chhan Diste ??', 'Bai song bhari ahe pan tu dance ka kela nahi ya song var ???', 'हे अती होतंय तू आता लग्नाचं बग शालू ….????', 'Very nice ??? location ??', 'Beautiful ?', 'शालूचा (लेहंगा) खुप छान घेतलाय तू …गावातिल सुंदरता तू टिकवून ठेवलीस ..??❤️', 'Superb❤️❤️', 'Lovely ❤️??', 'Gorgeous god bless you', '?Uff heavy', 'आईशप्पथ एकदम फ्रेश ना ?❤️',' Jabya Kuthey ??', 'Wow beautiful ?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. यावरून नेटकऱ्यांना 'फँड्री' या चित्रपटातील जब्याची आठवण काढल्याचे दिसत आहे. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. आतापर्यत जवळपास १५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news